एका ट्रिपची गोष्ट
छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती आपल्याला पुस्तक,सोशल मिडियातुन मिळतच असते . त्याचबरोबर चित्रपट , नाटक आणि महाराष्ट्रातील संस्कृती यातून महाराजांचे हूबेहूब चित्र रंगविण्यात आले आहे . परंतु या पलिकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर दुर्गदुर्गेश्वर रायगडवरच गेले पहिजे . रायगडवर काय जादू आहे , काय माहिती पण जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर जाणार तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम अधिका धिक वाढत जाणार यात शंका नाही . त्याच भावनेने काही वर्षांपूर्वी कुटुंबासोबत रा यगडावर गेलो ...