एका ट्रिपची गोष्ट

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती आपल्याला पुस्तक,सोशल मिडियातुन  मिळतच असतेत्याचबरोबर चित्रपटनाटक आणि महाराष्ट्रातील संस्कृती यातून महाराजांचे हूबेहूब चित्र रंगविण्यात आले आहेपरंतु या पलिकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर दुर्गदुर्गेश्वर रायगडवरच गेले पहिजेरायगडवर काय जादू आहेकाय माहिती पण जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर जाणार तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम अधिकाधिक वाढत जाणार यात शंका नाहीत्याच भावनेने काही वर्षांपूर्वी कुटुंबासोबत रायगडावर गेलो होतो.आपल्याला शिवाजी महाराजांविषयी अधिक माहितीचे ज्ञान द्यायचे असेल तर यांना रायगडवर घेऊन गेलेच पाहिजे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा अदभुत सोहळा पाहण्याच्या उद्देशाने एक दिवस आधीच सायंकाळी सहा वाजता आम्ही आमच्या महाड तालुक्यातील उंदेरी गावावरुन निघालो पाचाडला  आमची रात्री राहण्याची सोय झालीरायगडावर जाण्यापूर्वी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या,पुस्तकात वाचल्या  होत्यारात्रभर शिवाजी महाराज की जयहर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होताशिवप्रेमी शिवज्योत (मशालघेऊन किल्ल्यावर चढाई करीत होतेरात्रीच्या काळाकुट्ट अंधारात मशालीचा प्रकाश यामुळे परिसर उजळून निघाला होताहा अदभुत नयनरम्य सोहळा डोळ्याचे पारणे फेडत होताघोषणांच्या आवाजातच आम्ही झोपी गेलो.

" ना शिवशंकर तो कैलासपती

ना लंबोदर तो गणपती

नतमस्तक तया चरणी

ज्याने केली स्वराज्य निर्मिती "


सकाळी सात वाजता रायगडावर जाण्यासाठी तयारीला लागलोआम्ही सर्वांनी पायी जाणेच पसंत केले.त्याचा आनंद काही वेगळाच असतो.तशी तेथे रोपवेची सुविधा आहे. शिवजयंती असल्यामुळे शिवप्रेमींची गर्दी अफाट होतीशिवाजी महाराजांचा जयघोष सुरुच होता.
रायगडावर पोहोचल्यानंतर आम्ही महाराजांचा रायगड पाहु लागलोछत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी कशी होती याची माहिती सांगत असताना हूबेहूब चित्र रंगविले जात होतेराणी महालबाजार पेठटक-मक टोक आणि खलबत गृहफाहालिया नंतर आम्ही सभागृहात आलोशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी वर्णन सुरू केल्यानंतर आपणच महाराजांच्या राज्याभिषेकास उपस्थित असल्याचा भास होत होताएकएक माहिती ऐकतांना अंगात उत्साह संचारला होता आणि अभिमानाने उर भरून येत होता.


प्रत्येक गोष्ट सांगितल्यानंतर शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली जात होतीशिवाजी महाराजांविषयी असंच ऐकत राहावं वाटत होतंम्हणून आम्ही जिथे गाइड दिसेल तिथे तिथे थांबून माहिती ऐकत होतोतीन-चार गाईडकडून माहिती ऐकून झाल्यावर आम्ही महाराजांच्या समाधीस्थळी गेलो आणि नतमस्तक झालो.

" खुश झाला तुम्हास बघुनी हरेक मावळा,

आला रायगड बघण्या तुमचा जयंती सोहळा "


जय भवानी,जय शिवाजी या घोषणा देत महाराष्ट्रधर्माची प्रेरणा घेत आम्ही गड पायउतार होऊ लागलो.खाली येताना आम्ही ताक प्यायलो.हॉटेलात जेवुन जड अंत: करणाने आम्ही रायगडाचा निरोप घेतला.तो अविस्मरणीय दिवस आणि त्या आठवणी अजुनही हृदयात ताज्या आहेत.

Comments