ज्योतिष शास्त्रातील काही रंजक गोष्टी

१. काही ज्योतिष कुंडली पाहताना सांगतात की बाळाला जीवनात पाण्यापासुन धोका आहे.पण हे जलभय जेव्हा चंद्राची महादशा येणार तेव्हाच त्याचे फळ मिळेल इतर वेळी घाबरण्याचे काही कारण नाही. 

२. अष्टम स्थानी जर पापग्रहांनी पाहत असणारा नेपच्युन चंद्रासोबत असेल तर पाण्यात बुडून मरण्याचा कुयोग असू शकतो. 

३.अष्टम स्थानात जर चंद्र आणि शनीची युती असेल तर चंद्राच्या दशेत गुदमरुन मरण्याचा संभव असतो.Anasthetia होऊ शकतो.त्यामुळे सहसा अश्या व्यक्तीने जास्त जलप्रवास करू नयेत. 

४.हर्षल आणि नेपच्युन यांची युती जर अष्टमात असेल तर विजेचा शॉक लागून पाण्यात मृत्यु येण्याची शक्यता असते. हर्षलाबद्दल सांगायचे तर हा ग्रह बुधाच्या १०० पट बुद्धीमान आणि मंगळाच्या १०० पट शक्तीवान आहे. इतर ग्रहांपेक्षा हर्षल(Uranus) हा ग्रह आकस्मिक आणि गंभीररीत्या फळ देणारा आहे. 

५.अष्टमेत चंद्र असेल तर जलाशयात पाण्यापासून  जलभयाचा धोका आणि जर नेपच्युन(Neptune) असेल तर समुद्रातील पाण्यापासून जलभयाचा धोका असू शकतो. 

६. अष्टम स्थान जर राहू या ग्रहाच्या अमलाखाली आले असता विषप्रयोग होण्याचा संभव असतो. 

७. अष्टम स्थानात पाप ग्रहांनी बिघडलेला चंद्र मिथुन राशीत असेल तर फुफ्फुसात पाणी होण्याचा संभव असतो. 

८. राशीप्रमाणे माणसाची चेहरेपट्टी असते. 

९. मेष(Aries)  राशीचा चेहरा सामान्यतः उग्र व नजर रोकठोक असते कारण या राशीचा  मालक मंगळ आहे आणि ही अग्निराशी आहे. 

१०. वृषभ(Taurus) राशीवाल्यांच्या डोक्यात सामान्यतः मजा चाललेली असते कारण ही शुक्र ग्रहाची स्थिर पृथ्वी राशी आहे.या राशीत comfort zone वर जास्त लक्ष्य असते.

११. मिथुन(Gemini)  राशीच्या चेहऱ्यात मिस्कीलपणा आणि life full मजे में जीने का हा भाव दडलेला असतो.ही बुध ग्रहाची वायुराशी आहे. 

१२. कर्क(Cancer) राशीवाल्यांचा चेहरा सामान्यतः sensitive असतो आणि डोळे लगेच पाणावतात. असे का बरे ? कारण कर्केचा स्वामी हा emotional चंद्र ग्रह आहे. ही माणसे खूप चांगली care takers असतात. 

१३. सिंह राशीची माणसे सामान्यतः confident आणि थोडी स्वाभिमानी असतात. कारण सिंह राशीचा मालक हा ग्रहांचा राजा सूर्य असतो.दुसऱ्यांच्या चुका काढण्यात ही माणसे चतुर असतात. 

१४. कन्या राशीवाल्या माणसांच्या चेहऱ्यात एक प्रकारचा अस्वस्थपणा दिसतो कारण ही बुद्ध ग्रहाची उच्च राशी आहे.ही माणसे खूप चांगले analyst असतात. 

१५ तुला राशीच्या माणसांच्या  चेहऱ्यात सामान्यतः  एक संतुलितपणा दिसतो.कारण ही शुक्राची स्वतःची राशी आहे. हि राशी शनिदेवांना आवडते. ही राशी अग्निराशींसारखी तापट नाही किंवा जलराशींसारखी जास्त भावनिकही नाही. 

१६. वृश्चिक राशीच्या चेहऱ्यावर सामान्यतः  तामसीपणा दिसतो. याला कारण आहे राशीचा  स्वामी मंगल आहे आणि मनाचा कारक चंद्र या राशीत नीच होतो.त्यामुळे मनाला वेदना होणे स्वाभाविक असते. 

१७. धनु राशीच्या चेहऱ्यावर सामान्यतः  ब्रह्मतेज दिसेल कारण ती गुरुची राशी आहे. 

१८.  मकर व कुंभ राशीच्या चेहऱ्यावर शनीमुळे थोडी नैराश्य तर मीन राशीच्याचेहयावर गुरु मालक असल्याने देवभक्ती  आणि भाबडेपणा दिसतो.  

 परत भेटुच एका नवीन लेखासह.तोपर्यंत हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House