एका ट्रिपची गोष्ट
कॉलेजला असताना आमची अशीच एक ट्रिप मध्यप्रदेश येथील सातपुडा टायगर रिझर्व आणि पचमऱ्ही येथे गेली होती.आम्ही एम.एस.सी.पर्यावरणशास्ञ भाग-१ व २ चे मिळुन २८ आणि वाईल्डलाईफचे १७ असे ४५ विद्यार्थी,२ शिक्षक आणि आमच्या मुख्य प्राचार्या आल्या होत्या.
सर्वांनी वेळेवर राञी ९:३० वाजता छञपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनल्सला भेटायचे ठरले.पिपारीया मध्यप्रदेेशला जाणारी ट्रेन २ तास उशिरा झाली.आम्ही भोजन करुन घेतले आणि ट्रेनची वाट पाहत बसलो.शेवटी १२:१५ वाजता ट्रेन आली.सर्वांनी सामान बोगीत भरले आणि आपापल्या सिटवर जाऊन बसलो.
मग पुढे धमाल सुरु झाली.आम्ही दमशराज आणि अंताक्षरी सुरु केली.ट्रथ आणि डेअर खेळताना तर लय भारीच डेअर देऊ लागलो.नंतर आम्ही सर्वांनी नाष्टा केला.पिपारिया रेल्वे स्टेशनवर आम्ही ४ वाजता पोचलो.
तिकडे गेल्यावर संध्याकाळी चहा प्यायल्यावर आम्ही सातपुडा राष्ट्रिय उद्यान पाहायला गेलो.तेथील ईको सिस्टिम आणि प्राणी-वनस्पतींबद्दल आम्हाला सांगितले.राञी नाईट सफारी होती.त्यात आम्ही ससा,निलगाय,अस्वल,वाघ,हत्ती,हरी ण ईत्यादी प्राणी पाहिले.नंतर आम्ही जेवण केले.ज्या लॉजवर आम्ही राहत होतो,त्याखाली आम्ही कँपफायर तयार केला.काही जण एकमेकांना भुताच्या गोष्टी सांगु लागले तर काही अंताक्षरी खेळु लागले.
सकाळी लवकर उठल्यावर आम्ही बोटींग करायला गेलो.तेथे आम्हाला तिवरांवर बसलेले पक्षी दिसले.त्यानंतर आम्ही हांडिफो येथे दरी पाहायला गेलो आणि त्याबरोबर महादेव आणि महादेव अश्या दोन शंकरदेवाचे दर्शन घेतले.जंगलातुन जात असताना आम्हाला १४८ प्रकारचे वेगवेगळे पक्षी दिसले.आम्ही पाचमऱ्ही या ठिकाणीही गेलो.त्या ठिकाणी खुप सुंदर वेगवेगळी रंगबेरंगी सदाहरीत बहरणारी फुले दिसली.त्या फुलांकडे पाहतच राहावे असे वाटत होते.निसर्गाने दिलेला तो स्वर्गातील एक भागच होता.
अश्या प्रकारे आमची अभ्यास सहल पण झाली आणि ट्रिपचा आनंदही घेता आला.ती ट्रिप खरचं संस्मरणीय झाली आणि आमच्या हृदयाच्या कोपऱ्यात ती कायमचं गोड आठवण म्हणुन राहील.
Comments
Post a Comment