थँक यु

आयुष्यात खुप सारे कठीण प्रसंग येतात.आयुष्यातील जगणं आपल्याला आईबाबाचं शिकवतात.शिक्षण देऊन आपल्या मुलांना स्वप्न देतात.त्यांच्या पंखांना बळ देतात.त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करतात.त्यांना पाठबळ देतात.जिवनात कितीही संकटे आली तरी आईबाबा आपल्या बाळाच्या पाठिशी खंबिरपणे उभी राहतात.
माझे आईबाबा असेच आहेत.निरागस आणि निर्मळ मनाचे.आजकाळच्या प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की,त्यांचा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावा.प्रत्येक मुलावर हे बिंबवले जाते.काही मुले यात यशस्वी होतात तर काही नावडत्या क्षेञात निराशेने आत्महत्या करतात.माझ्या आईबाबांसारखे पालक मिळणे विरळाच.त्यांनी कधीही आमच्यावर करिअरसाठी दबाव टाकला नाही.स्वत:च्या आवडीचे करिअर क्षेञ निवडण्याचे स्वातंञ्य दिले.स्वप्नांना स्पर्श करुन आकाशाला गवसणी घालण्याचे बळ दिले.म्हणुनच आज आमच्या क्षेञात यशस्वी होऊ शकलो ते त्यांच्या आशिर्वादामुळेच.
आजच्या या धकाधकीच्या जिवनात माझ्या या आईबाबांना,माझ्या हृदयातील या विठ्ठल रखुमाईला थँक यु म्हणायचे राहुनच गेले.आताची जनरेशन मदर्स डे,फादर्स डे साजरे करुन त्यांच्याबरोबर सेल्फी काढतात.आम्हाला माञ असे नाही जमले.आई बाबा थँक यु सो मच.आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळेच.मातृ-पितृ देवो भव.

माझे नाव- प्रमोद वासुदेव गायकवाड

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House