थँक यु
ताई किती गोड शब्द आहे ! 'फुलों का तारों का सबका कहना है,एक हजारों में मेरी बेहना है l' हे एका चिञपटातील गाणे.माझी ताईपण तशीच आहे.माझी लहानपणापासुनची बेस्ट फ्रेंड.माझी प्रत्येक गोष्ट मी तिच्याशी शेअर करयचो.शाळेतील मजेपासुन ते कॉलेमधील घडलेले प्रसंग आणि बरेच काही.
२००५ ला ताईचे लग्न झाले. मी जेमतेम त्यावेळी कॉलेजला जात होतो.आपण सर्वच गोष्टी आईबाबांना सांगतो असे नाही,काही गोष्टी शेअर करायला आपली खास अशी मैञिण किंवा मिञ हवा असतो.तिच माझी मैञिण तायडु आहे.एकदम निरागस,समोरच्या माणसाच्या मनाचा विचार करणारी,उत्तम गृहिणी.आम्हाला घडवण्यात आईबाबांबरोबर तिचाही वाटा आहे.संस्कार,बाहेरच्या जगाचे बारकावे आम्हाला ताईकडुनच शिकायला मिळाले.
ताई एक वेगळेच रसायन आहे.कितीही संकटे आली तरी घाबरायचे नाही,धैर्याने त्याच्याशी लढा द्यायचा ही शिकवण ताईकडुनच आम्हाला मिळाली.देव आपली परिक्षा पाहत असतो.त्याने निर्माण केलेल्या जिवनाच्या प्रत्येक परिक्षेला हसत हसत सामोरे जायचे.कधीकधी मनासारखी गोष्ट झाली नाही की,मन उदास होते पण ताईशी फोनवरुन बोलले की,बरे वाटते आणि टेन्शन गेल्यासारखे वाटते.
वर्ष कशी भरभर निघुन गेली,पण माझ्या बहिणाबाईला थँकु म्हणायचे राहुनच गेले.थँक यु ताई.तिच्या बद्दल मी एवढेच म्हणेल की,
आईबाबांची काळजी,भावंडांची चिंता,
मनी धरुन जगते,बहिण माझी.
जरी या जगात आईच्या मायेला कुणाचीही सर नाही,
पण तिच्या प्रेमाएवढेच नि:शंक जिचे प्रेम राही अशी ती माझी ताई.
माझे नाव- प्रमोद वासुदेव गायकवाड
Comments
Post a Comment