घेई छंद

छंद म्हणजे आवड.छंद म्हणजे विरंगुळा.छंद असलेल्या माणसाचे जीवन कसं शेवटपर्यंत ताज्या गुलाबाप्रमाणे सुगंधी टवटवीत राहते.'पिंडे पिंडे मतिर्भिन्न :' त्याचप्रमाणे 'पिंडे पिंडे छंदा: भिन्न : ' ' व्यक्ती तितक्या प्रकृती. 'प्रत्येकाचे छंद वेगवेगळे.माझा छंद वृक्ष लावण्याचा,त्याच्या संगोपनाचा त्याची काळजी घेण्याचा,त्याला वाढवण्याचा आणि त्याला वाचवण्याचा आहे.या विश्वाला हवामानबदलाने ग्रासले आहे याचे मुख्य कारण वृक्षाचे प्रमाण कमी होणे हे आहे.मला माझ्या कामातुन वेळ भेटला की,रोपे लावयला खुप आवडतात.

शास्ञात म्हटले आहे की,ब्रम्हानंद हा सर्वश्रेष्ठ आनंद होय.हा ब्रम्हानंदसहोदराचा आनंद आपल्याला छंदातुनच मिळतो.मलाही वृक्षांसोबत वेळ घालवायला खुप आवडतो.सुटीच्या दिवशी माझा बहुतेक वेळ त्यांच्यासोबतच जातो.मी माझे देहभान विसरुन जातो.झाडांबरोबर असताना एका वेगळ्याच विश्वात मी सफर करत असतो.

वृक्ष माझी माता l वृक्ष माझा पिता I
सगासोयरा तो I सुखाचा निवारा ञाता I
वृक्ष आपल्याला भरभरुन देतात.ते परोपकारी आहेत.आपण त्याची जाण ठेवायला हवी.लहान मुलांना झाडाचे महत्त्व सांगायला हवे.झाडे लावा,झाडे जगवा हे  ब्रिदवाक्य लक्षात ठेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपण करावे.

झाड माझ्या विरंगुळ्याचे,घडीभरल्या भटकंतीचे
पावसात थुईथुई नाचणारं,ह्रदयी लेणं सुगंधाच
झाड माझं होईल कल्पतरु,उबेचं नि सावलीचं
दहा दिशांनी बाहु पसरुनी,शिकविल बळ सामर्थ्याचं
उभय बाजुनी चिञतरुंची,दार लागली छाया
पांथस्थाला सुखकर मोठी,श्रमहर मार्गी जाया II

आज प्रदुषण झपाट्याने वाढत आहे.झाडे लावणे हा प्रदुषण कमी करण्याचा मुलमंञ आहे.झाडे वायुप्रदुषण,जलप्रदुषण,ध्वनीप्रदुषण कमी करण्यास मदत करतात.
चला सोडवु दुष्काळाचे प्रदुषणाचे कोडे
चला वाढवु वनसंपत्ती,चला लावुया झाडे
प्रगतीच्या भरधाव रथाचे,हिरवे हिरवे झेंडे
चला वाढवु वनसंपत्ती,चला लावुया झाडे
शपथ घेऊया सारे मिळुनी,पर्यावरणाचे पुजन करु
नच माज करु वनसंपत्तीचा,वृक्षाचा सन्मान करु.

तर अशी ही झाडे आणि त्याचे संवर्धन.जंगल आणि झाडांचे वाचन करत असताना आपण अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखे वाटते.या खजिन्यातील वृक्षांचा सहवास आपल्यावर स्वर्गिय आनंदाची बरसात करतो.तो लुटताना माझे मन धुंद होते.मग स्वर्ग शोधायचा तर कशाला ? पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो ईथेच आहे.मला माझ्या पृथ्वीमातेला नेहमी प्रसन्न,सदाहरीत पाहायचे आहे.त्यासाठी मला हे वृक्षलागवडीचे पुण्यकर्म करायलाच हवे आणि तो माझा छंदच आहे.त्यात मला स्वर्गिय आनंद प्राप्त होतो.

माझे नाव- प्रमोद वासुदेव गायकवाड

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House