क्षण कसोटीचे
आम्ही बांदोडकर कॉलेजमध्ये एम.एस.सी.पर्यावरणशास्ञ मध्ये शिकत असताना आमच्या वर्गात खदिजा नावाची मुलगी होती.आम्ही सर्व वर्गमिञ मिळुन एकञ मिळुन मिसळुन राहत असु.
एके दिवशी आम्हाला जर्नल सबमिट करायची होती.त्या दिवशी सर्वजण ती पुर्ण करण्यात मग्न होतो.अचानक तिला श्वसनाचा ञास सुरु झाला.श्वास घेण्यात अडथळा येऊ लागला.आम्ही तिला पाणी दिले.नंतर आम्ही तिला वर्गामधुन बाहेर आणले.एका खुर्चिवर बसवले.तिला थोड्या मोकळ्या हवेत श्वास घेऊ दिला,तरीही तिच्या श्वसनाचा ञास कमी होत नव्हता.
मी लगेच जाऊन प्राणीशास्ञ विभागाच्या प्रयोग शाळेतुन रसनाचे पाकिट घेऊन आलो.आमच्या तेथील सरांनी ते पाण्यात तयार करुन तिला प्यायला दिले.ते प्यायल्यानंतर तिला थोडेसे बरे वाटले परंतु तरीही तिला चक्करसारखी येत होती.हे सर्व अशक्तपणामुळे झाले असावे,असे वाटत होते.मी लगेच जाऊन जवळच्या दुकानातुन डेअरी मिल्क घेऊन आलो.फिरदोस नावाच्या एका मैञिणीने त्या तिला खाऊ घातल्या.
आता तिला थोडे बरे वाटत होते.झालेला सर्व प्रकार मग आमच्या प्रधानाचार्यांना कळला.खदिजाला विचारल्यावर तिने सर्व काही सांगितले.घरुन येताना तिने जेवणाचा डबा आणला नव्हता आणि काही नाष्टापण करुन आली नव्हती.
प्रधानाचार्यनी सर्व मुलामुलींना उद्यापासुन मला सर्वांकडे जेवणाचा डबा दिसला पाहिजे,असा सज्जड दम दिला.जर एखाद्याला शक्य होत नसेल तर मला सांगा.मी त्यासाठी चार पोळ्या जास्त आणत जाईन.पण बाळांनो दररोज जेवणाचा डबा आणत जा नाहीतर आजच्यासारखा प्रसंग ओढावतो.
आम्ही झाला प्रकार तिच्या वडिलांना दुरध्वनी करुन सांगितला होता.ते लगेच गाडी घेऊन आले आणि तिला घरी घेऊन गेले.त्या प्रसंगातील कसोटीच्या क्षणांची आठवण काढल्यावर आजही मन कावरेबावरे होते.
-प्रमोद गायकवाड
Comments
Post a Comment