जागतिक हत्ती दिनाविषयी
घोक्यात आलेले हतींचे अस्तित्व टिकून राहण्याच्यासाठी दृष्टीने जागरूकतेच्या दृष्टिकोनातून २०१२ साली जागतिक हत्ती दिनाची सुरुवात झाली. जंगलातील बलाढ्य , म्हटलं तर दिसायला ओबडधोबड , रंगही आकर्षक नाही , भलेमोठे कान , विचित्र आकारातील सोंड , आवाजही कर्कश्श .. कसा दिसतो हा हत्ती .. ! तरीदेखील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना या प्राण्याबद्दल विशेष आत्मीयता वाटते . लहानपणी शिकवल्या जाणाऱ्या चित्रांमध्येसुद्धा पिढ्यान् पिढ्या हत्तीचे कार्टून काढले जाते आहे . आपल्या सणांमध्ये , संस्कृतीमध्ये , आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या आख्यायिकेमध्येही हत्तीला विशेष ...