जागतिक हत्ती दिनाविषयी

 घोक्यात आलेले हतींचे अस्तित्व टिकून राहण्याच्यासाठी दृष्टीने जागरूकतेच्या दृष्टिकोनातून २०१२ साली जागतिक हत्ती दिनाची सुरुवात झाली.जंगलातील बलाढ्यम्हटलं तर दिसायला ओबडधोबडरंगही आकर्षक नाहीभलेमोठे कानविचित्र आकारातील सोंडआवाजही कर्कश्श.. कसा दिसतो हा हत्ती.. ! तरीदेखील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना या प्राण्याबद्दल विशेष आत्मीयता वाटतेलहानपणी शिकवल्या जाणाऱ्या चित्रांमध्येसुद्धा पिढ्यान् पिढ्या हत्तीचे कार्टून काढले जाते आहेआपल्या सणांमध्येसंस्कृतीमध्येआराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या आख्यायिकेमध्येही हत्तीला विशेष स्थान आहेपूर्वजांनी तर रानटी हत्तींवर पाळीव प्राण्यांचे संस्कार करून लढाईमध्ये हत्तींना वापरले होते.


भारतात हत्तीला धार्मिक महत्त्व आहेआपल्याकडे हत्तीची पूजाही केली जातेआंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र लोक हत्तीच्या जिवावर उठले आहेतशोभिवंत वस्तूंसाठी त्यांना हत्तीचे दात हवे आहेतपृथ्वीवर दर पंधरा मिनिटाला एका हत्तीचा मृत्यू होत आहेत्यामुळे या देखण्या प्राण्याला वाचविण्यासाठी दर वर्षी १२ ऑगस्टला जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो.


'इंटरनॅशनल ट्रेड इंन एनडेन्जर्ड स्पेशीज ऑफ वाइल्ड फवना अँड फ्लोराया (सिटीजया संस्थेने १९८९ मध्ये धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या यादीमध्ये हत्तींचा समावेश केलायानंतर खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर हत्तींच्या शिकारीची गांभीर्याने चर्चा सुरू झालीहत्तींचे अस्तित्व असलेल्या देशांनी त्यांच्या पातळीवर विविध योजनांचे नियोजन केलेज्या भागात हत्तींची संख्या जास्त आहेतेथील हत्तींचे स्थलांतर करण्यात आलेकाही ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे 'प्रोजेक्ट एलिफंट'देखील जाहीर झाले.


गेल्या काही वर्षांत सर्वांचा लाडका असलेला हा प्राणी अस्तित्त्वाची लढाई लढतो आहेचोहोबाजूंनी संकटात सापडलेला हा हत्ती सैरभैर झाला आहेहस्तीदंताला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांमुळे गेल्या वीस वर्षांपासून हत्ती आंतरराष्ट्रीय तस्करांच्या रडारवर आहेधक्कादायक बाब म्हणजे दर पंधरा मिनिटाला एका हत्तीची शिकार होत असल्याचे 'इंटरनॅशनल फंड फॉर 
ऐनिमल वेलफेअरसंस्थेच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.

चीन देशानेही अलीकडेच हस्तीदंताच्या व्यापाराला पहिल्यांदाच अधिकृतपणे बंदी आणली आहेतस्करीमुळे दहा लाखांच्या घरात असलेले हत्ती आता  लाखांपर्यंत कमी झाले आहेतत्यामुळे हत्तींना वाचविण्यासाठी एकत्र याअशी साद चीनने घातली असून जगभरातील अनेक सेलिब्रेटी या चळवळीत सहभागी झाले आहेतएवढेच नव्हेतर चीनने देशातील हस्तींदताचे १७२ कारखाने बंद केले आहेत.
जगात प्रामुख्याने दोन प्रकारचे हत्ती आढळतातआफ्रिकन हत्ती आणि आशियायी हत्तीआफ्रिकन हत्ती हे आफ्रिकन बुश आणि आफ्रिकन फॉरेस्ट या दोन प्रकारांत विभागण्यात आले आहेतआफ्रिकेतील नर आणि मादी दोन्ही हत्तींना दात असतातहत्तीच्या दातांसाठी त्यांची शिकार होते आहेसाधारणतशंभर वर्षांपूर्वी आफ्रिकन हत्तींची संख्या ३० लाखांहून जास्त होतीती आता साडे चार लाखांवर आली आहेसर्वाधिक हत्ती हे आफ्रिकेत असून शंभर वर्षांपूर्वी त्यांची संख्या तीस लाखांहून अधिक असल्याचे संदर्भ सापडतातपण हस्तीदंतासाठी केलेल्या बेसुमार कत्तलीमुळे हत्तींची संख्या झपाट्याने खाली आलीअमेरिका आणि चीन या देशात हस्तीदंताची सर्वांत मोठी बाजारपेठ आजही कार्यरत आहेत.

आफ्रिकेत हत्ती नाट्य रंगलेले असताना भारतालाही आशियायी हत्तींना वाचविण्याची जाणीव झालीयाच काळात भारतातही हत्तींच्या बाबतीत अनेक घडामोडी घडल्यावन विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात शिकारी झाल्यामनुष्य आणि हत्ती संघर्षही चिघळलावाघांच्या बरोबरीने हत्तींची शिकारविविध कारणांमुळे त्यांचे मृत्यू वाढल्याने केंद्रीय वने आणि मंत्रालयाने १९९२ 'प्रोजेक्ट एलिफंटस्थापन केलाहत्तींचे अस्तित्त्व असलेल्या राज्यांना या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेतलेहत्तींच्या अधिवासाला संरक्षणत्यांच्या फिरण्याच्या मार्गावर कॉरिडॉर तयार करणे अशा अनेक मुद्द्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला.

Comments