Posts

Showing posts from August, 2021

Morning Motivation - मराठी

रोज सकाळी जेव्हा मी काही चांगले ऐकतो,चांगले पाहतो आणि चांगला विचार करतो मग माझा पूर्ण दिवस चांगला जाण्याची शक्यता खूप वाढते. जेव्हा एक एक करून माझा प्रत्येक दिवस चांगला जायला लागतो मग माझे आयुष्यही आनंदी होत जाते. मी माझ्या हृदयाच्या प्रत्येक श्वासाने आजच्या या सुंदर दिवसाचे स्वागत करतो.आजचा दिवस माझ्या येणाऱ्या सुंदर आयुष्याचा पहिला दिवस आहे. मला पूर्ण खात्री आहे कि आजचा दिवस या माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्वात चांगल्या दिवसांपैकी एक असेल. आज मी खूप आनंदी आहे कारण मला पूर्ण विश्वास आहे की आज असे काही तरी होईल जे आजपर्यंत कधीच झाले नसेल. आज मी काहीतरी नवीन शिकेल,काहीतरी नवीन करेल, काहीतरी नवीन ऐकेल,काहीतरी नवीन विचार करेल आणि काहीतरी नवीन बनेल.आज मला खूप जास्त छान वाटत आहे.गेलेल्या भूतकाळात माझ्याकडून नकळतपणे ज्या काही चुका झाल्या असतील किंवा माझ्यासोबत इतर कोणी चुकीचे वागले असतील त्यासाठी मी स्वतःला आणि इतर सर्वांना पूर्णतः माफ करतो. माझे लक्ष्य गेलेल्या भूतकाळावर नाही तर भविष्यातील येणाऱ्या क्षणांवर आहे. आज मला जे काही करायचे आहे त्याबद्दल पूर्णतः विचार केलेला आहे आणि माझे प्रत...