Morning Motivation - मराठी
रोज सकाळी जेव्हा मी काही चांगले ऐकतो,चांगले पाहतो आणि चांगला विचार करतो मग माझा पूर्ण दिवस चांगला जाण्याची शक्यता खूप वाढते. जेव्हा एक एक करून माझा प्रत्येक दिवस चांगला जायला लागतो मग माझे आयुष्यही आनंदी होत जाते. मी माझ्या हृदयाच्या प्रत्येक श्वासाने आजच्या या सुंदर दिवसाचे स्वागत करतो.आजचा दिवस माझ्या येणाऱ्या सुंदर आयुष्याचा पहिला दिवस आहे. मला पूर्ण खात्री आहे कि आजचा दिवस या माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्वात चांगल्या दिवसांपैकी एक असेल. आज मी खूप आनंदी आहे कारण मला पूर्ण विश्वास आहे की आज असे काही तरी होईल जे आजपर्यंत कधीच झाले नसेल.
आज मी काहीतरी नवीन शिकेल,काहीतरी नवीन करेल, काहीतरी नवीन ऐकेल,काहीतरी नवीन विचार करेल आणि काहीतरी नवीन बनेल.आज मला खूप जास्त छान वाटत आहे.गेलेल्या भूतकाळात माझ्याकडून नकळतपणे ज्या काही चुका झाल्या असतील किंवा माझ्यासोबत इतर कोणी चुकीचे वागले असतील त्यासाठी मी स्वतःला आणि इतर सर्वांना पूर्णतः माफ करतो. माझे लक्ष्य गेलेल्या भूतकाळावर नाही तर भविष्यातील येणाऱ्या क्षणांवर आहे. आज मला जे काही करायचे आहे त्याबद्दल पूर्णतः विचार केलेला आहे आणि माझे प्रत्येक ध्येय पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी तयार आहे. माझे मन पूर्णतः शांत आहे आणि माझे चित्त माझ्या ध्येयावर पूर्णतः केंद्रित आहे. माझे विचार खूप सकारात्मक आहेत.मला वाटते की,जे पण माझ्यासोबत होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे.
माझ्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्यांना मी एक अडसर नाही तर एका संधीप्रमाणे पाहतो.स्वतः साठी पुढे जायची संधी,स्वतःला समजून घेण्याची संधी,स्वतःला अंतर्मनातून अजून शक्तिशाली बनवण्याची संधी मी त्यात पाहतो. आज जी आव्हाने माझ्या समोर येणार आहेत त्यांच्यासोबत लढा देण्यासाठी पूर्णतः तयार आहे. मला माझ्या आयुष्यावर खूप प्रेम आहे. माझे शरीर अंतर्मनातून पूर्णतः निरोगी आहे आणि माझी विवेकबुद्धी आयुष्याच्या कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी पूर्णतः सक्षम आहे. माझे मन आनंदाने भरलेलं आहे आणि मी नेहमी खुश राहतो,मस्त जगतो आणि हसत खेळात आयुष्याचा रसास्वाद घेतो आणि मनमुराद आनंद लुटतो..
हे आयुष्य माझ्यासाठी एका खेळासारखे आहे आणि मी या खेळाचा एक कसलेला खेळाडू आहे. मला जिंकणं किंवा हरणं याने काहीच फरक पडत नाही.माझा फक्त एकाच उद्देश आहे की आयुष्याच्या या खेळात मला स्वतःला एवढं सक्षम बनवायचे आहे की, निस्सीम आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी या या जगात आहेत त्या चालत माझ्याकडे येतील. आज जे काही माझ्याजवळ आहे आणि जे लोक माझ्यासोबत आहेत त्या सर्वांसाठी मी माझ्या हृदयाच्या प्रत्येक श्वासाने मी आभार व्यक्त करतो. माझ्याजवळ कशाचीही कोणतीही कमतरता नाही.निर्सगाने मला खूप भरभरून दिलेले आहे.
मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.ब्रह्माण्ड आणि आकाशगंगेतील साऱ्या शक्ती माझ्यासोबत आहेत आणि माझ्या अंतरंगात त्या ऊर्जेचा मुबलक साठा आहे. आता जे काही होऊ दे,मला पुढे जाण्यापासून जगातील कोणतीच शक्ती रोखू शकणार नाही,मला सर्व शक्य आहे. जे मी विचार करू शकतो,ते सर्व मी करू शकतो,ते सर्व मी करू शकतो.Be the Best.
परत भेटुच एका नवीन लेखासह.तोपर्यंत हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!
Comments
Post a Comment