वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघर(kitchen ) कसे असावे ?

१. किचनसाठी आग्नेय दिशा उपयुक्त मानली जाते.

 २. kitchen मध्ये हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या शक्यतो पूर्व किंवा पश्चिमेकडे असाव्यात.वातावरणात असणाऱ्या विधायक शक्ती आकर्षित होण्यास ते फायद्याचे ठरते. 

 ३. स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेकडे असेल याची दक्षता घ्यावी. पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करणे शुभ मानले जाते. खिडक्या एकमेकांविरुद्ध असल्यास अधिक उत्तम. 

 ४. फ्रीजचे kitchen मधील स्थान अटळ आहे.फ्रिज ठेवताना स्वयंपाक घरात वायव्य दिशेला ठेवावे.

 ५. स्वयंपाकाचा ओटा दक्षिण किंवा पश्चिमेकडील भिंतीस लागून असावा. 

 ६. exhaust fan ईशान्य दिशेला ठेवल्यास उत्तम.परंतु दक्षिण किंवा पूर्व दिशाही यासाठी उपयुक्त आहे.

 ७. Dining Table kitchen मध्येच पश्चिमेलाच ठेवावे. kitchen स्वच्छ ठेवावे.कचरा किंवा कचऱ्याची पेटी स्वयंपाक घरात न ठेवल्यास उत्तम. 

 ८. स्वयंपाकाचा gas ओटयाच्या उजव्या बाजूस ठेवावा.

 ९. स्वयंपाक घरातील भिंतीवर निळा किंवा पांढरा रंग लावल्यास अतिउत्तम. 

 तुम्हाला जर वास्तुशास्त्र,अंकशास्त्र,ज्योतिष शास्त्र याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर खाली comment करा किंवा माझ्या ९१३७३३६७०४ या क्रमांकावर संपर्क करा.परत भेटुच एका नवीन लेखासह.तोपर्यंत हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House