पोलीस किंवा सैन्यामध्ये नोकरीसाठी योग
ओम नमो भगवते वासुदेवाय
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस किंवा सैन्यामध्ये नोकरीसाठी कोणते योग आवश्यक आहेत.
१ कुंडलीतील घरांचा विचार करता पहिले घर,तिसरे घर,चौथे घर,पाचवे घर,आठवे घर,दहावे घर आणि अकरावे घर यांचा विचार केला जातो.
२.आता पोलीस किंवा सैनिक बनण्यासाठी कोणत्या राशी महत्वाच्या आहेत ते पाहू.वरील कुंडलीतील घरांमध्ये मेष राशी,सिंह राशी,वृश्चिक राशी,धनु राशी किंवा मकर राशी असेल तर उत्तम
३. या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी ४ ग्रह मुख्यतः विचारात घेतात.हे ग्रह जर वरील राशींमध्ये असतील तर चांगले -
मंगल जो लढाऊ बाण्याचे प्रतीक आहे.
सूर्य जो सरकार दर्शवतो कारण दोन्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याशी निगडित काम करतात
शनी जो शिस्तप्रियता,कठोर मेहनत आणि चिकाटी हे गुण दर्शवतो आणि ते सैनिकाला अत्यंत आवश्यक असतात
केतू जो शस्त्रास्त्रे दर्शवतो त्याचे मंगलबरोबर संबंध दररोजच्या जीवनात शस्त्र हाताळणे दर्शविते.
४. ग्रह पाहिल्यानंतर आता कोणती नक्षत्र महत्वाची आहेत ते पाहू.वरील चार ग्रह जर धनिष्ठा,चित्रा,मृगशिरा,आर्द्रा,मघा किंवा ऊत्तराषाढा या नक्षत्रात असतील तर सैनिक किंवा पोलीस होण्याचा योग प्रबळ होतो.
५.त्याचबरोबर मंगल जर जातकाचा आत्माकारक घाह असेल आणि त्याची महादशा किंवा अंतर्दशा चालू असेल तर भरती होण्याचा योग येतो.
आता आपण आपले आर्मी जनरल श्री नरवणे यांच्या कुंडली चा अभ्यास केला असता खालील बाबी अधोरेखित होतात
अ) त्यांचा मंगल,केतू आणि चंद्र यांची तिसऱ्या स्थानातील युती त्यांना आर्मी या क्षेत्राकडे घेऊन गेली आणि लग्नी गुरु-शनीची युती आणि पंचमात उच्च राशीतील सूर्य त्यांना आर्मी मधील सर्वोच्च पदावर आर्मी जनरल पर्यंत घेऊन गेली.
शुभं भवतु
Comments
Post a Comment