बुध ग्रह

ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण थोडे बुध ग्रहाबद्दल पाहु. बुद्धी,हजरजबाबीपणा,गणिती बुद्धी,आकलन शक्ती,grasping power,instant solution,वाचा,मातुल घराणे,विनोद बुद्धी,communication,लिखाण,पत्रकार,sales man,agents,analyst,चिकित्सा करणारा(specially कन्या),ज्योतिषी,critics,विनोदी लेखन करणारे,वकील,व्यापारी वर्ग दर्शवतो. त्याची उच्च राशी कन्या तर नीच राशी मीन आहे. मिथुन आणि कन्या दोन्ही द्वीस्वभावी राशी आहेत.बुध एखादी गोष्ट एकाहून जास्त वेळा घडवून आणतो.सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बुध असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल तर एकाहून अधिक विवाह होण्याचा संभव असतो.दशम स्थानात हि अवस्था असल्यास एकाहून अधिक गोष्टी अर्थार्जनाकरिता करण्याकडे कल असतो. जर आजार संबंधी प्रश्न असेल आणि षष्ठ स्थानाचा मालक किंवा उपनक्षत्र स्वामी बुध आला तर second opinion घ्या म्हणून सांगतात. Medical Astrology मध्ये बुधावरुन nervous system,चक्कर येणे,मेंदूचे विकार,श्वसनाचे आजार,दमा,पचन,आतडी,वाचा दोष,त्वचा रोग,इत्यादी पाहतात. कुंडलीत बिघडलेला बुध असेल तर मामा-मावशी बरोबर संबंध चांगले ठेवावे.प्रसंगी मदत करावी. शुभं भवतु ..

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House