"लव्ह मॅरेज"चे ज्योतिष शास्त्र
कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतोच, मला एक गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड पटेल का ? माझे लव्ह मॅरेज होईल का ? जवळपास ९० टक्के लोकांची ईच्छा असते कि आपले लव्ह मॅरेज व्हावे आणि ते इतके कठीणही नाही.कोणीही कोणत्याही वेळी लग्न करू शकते मग ते प्रेमविवाह असेल किंवा अरेंज मॅरेज पण महत्वाचे हे आहे की काळाच्या वेगाने ते टिकते कि तुटते हे तेव्हांच शक्य आहे ज्यावेळी दोघांच्या कुंडल्या एकमेकांना सपोर्ट करत असतात
ज्योतिषशास्त्र या सर्वांची उत्तरे देऊ शकते.जेव्हा आपण प्रेमाचा विचार करतो तेव्हा चन्द्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रामुख्याने विचार केला जातो.मुलीच्या पत्रिकेत गुरु हा नवऱ्याचा कारक ग्रह आहे तर मंगल हा बॉयफ्रेंड चा कारक ग्रह आहे.प्रेम विवाहासाठी आपल्याला कुंडलीतील ५वे घर,७वे घर आणि ११वे घर पाहावे लागते.असेच काही तुमच्या कुंडलीतील निर्देश देणाऱ्या गोष्टी पाहूया :
१.कुंडलीतील पंचम स्थान हे प्रेम आणि प्रणयाचे मुख्य स्थान आहे आणि शुक्र ग्रह हा प्रेमाचा मुख्य कारक आहे.जर तुमच्या पंचम स्थानात शुक्र ग्रह असेल तर तुमचा प्रेम विवाह होऊ शकतो
२.अश्यावेळी शुक्र ग्रह तुमच्या कोणत्याही राशीत असू शकतो त्यामुळे बाकी ग्रहांचे कार्य आणि त्यांचा सपोर्ट प्रेम विवाह साठी उपयुक्त ठरतो.पहिले आपण मंगळाचे पाहूया,जर मंगल आणि शुक्र एकमेकांबरोबर असतील किंवा त्यांच्यात दृष्टी संबंध असेल तर प्रेम विवाहाची शक्यता खूप वाढते.असे का बरे ? कारण शुक्र हे प्रेम आहे आणि मंगल त्याला उत्कटता आणि धैर्य देते.त्यामुळे तो मनुष्य प्रेमासाठी कुटुंब किंवा समाजाकडून होणाऱ्या कोणत्याही समस्येला टक्कर देण्यात तत्पर असतो.
३.शुक्र ग्रह जर नवम स्थानात असेल किंवा धनु राशीत असेल तर प्रेमविवाहाला योग निर्माण होतो कारण धनु राशी आणि नावं स्थान हे वेगळा वंश ,जात,धर्म यांची पार्श्वभूमी दर्शवते आणि दुसऱ्या जात किंवा वंशमधील व्यक्तीबरोबर संबंध असणे हे प्रेमविवाहातच रूपांतर होऊ शकते.
४.जेव्हा शुक्र ग्रह आणि राहू ग्रह एकमेकांच्या युतीमध्ये असतील किंवा त्यांचा दृष्टी संबंध असेल तर कोर्ट विवाहाचा योग,आई वडिलांच्या विरुद्ध जाऊन लग्न करणे असे योग्य येतात.तसेच मुलीने आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्तीशी लग्न करणे आणि परदेशी जोडीदार मिळण्याची शक्यता असते.
५. शुक्र आणि चंद्राची जर पंचम स्थानात किंवा एकादश स्थानात असेल तर प्रेमविवाहाचा योग असतो कारण पंचम स्थान हे प्रणयस्थान आणि एकादश स्थान हे तुमच्या मित्रमैत्रिणींचे स्थान आहे.त्यामुळे तुमचा भावी जोडीदार तुमच्या मित्र परिवालातील असू शकेल.
६.आता कुंडलीतील स्थानानुसार पाहूया.जर पाचव्या स्थानाचा मालक सप्तम स्थानात असेल तर प्रेमविवाहाला योग्य असतो कारण तो मनुष्य आपल्या प्रेमाचे लग्नात रूपांतर करण्यासाठी तत्पर असतो.
७.जर सप्तम स्थानाचा मालक लग्नस्थानी किंवा प्रथम स्थानी असेल तर त्याचा जोडीदार त्याच्याकडे आकर्षित होईल,या स्थितीत प्रेमविवाहाला योग्य आहे.
८.जर द्वितीय स्थानाचा मालक आणि एकादश स्थानाचा मालक सप्तम स्थानात बसलेले असतील तर प्रेमविवाहाचा योग्य होतो.द्वितीय स्थान हे आपल्या जवळच्या मित्रांचे तर एकादश स्थान आपल्या मित्रमैत्रिणींचे असते त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्या जवळच्या मित्रपरिवारातील असेल ज्याच्याबरोबर तुमचे बंद खूप घट्ट असतील.
काही मित्रांना आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तुमच्या रिलेशनशिप ऍस्ट्रोलॉजि बद्दल तर तुमच्या जन्मतारीख,जन्मवेळ आणि जन्मस्थळ लिहून ९१३७३३६७०४ या नंबरवर व्हाट्सएप करा किंवा मेल करा pg37750@gmail.com
Comments
Post a Comment