पत्रिकेतील नेपच्युन
नेपच्युन म्हणजे गुढता, कल्पनाशक्ती, intuition power, तरलता, हळुवारपणा,संवेदनक्षमता,भावनाशीलता,कोमलता आहे. त्याला स्वतःची अशी रास नाही. जलराशीत नेपच्युन जास्त प्रभावी असतो. अंदाज खरे होतात. नेपच्युन हा सूचक स्वप्ने पडायच्या पत्रिकेत अधिक प्रभावी असतो. आता आपण कुंडलीतील स्थानांनुसार नेपच्युन कशी फळे देतो हे पाहू :
प्रथम स्थानी असलेला नेपच्युन भावनाप्रधान बनवतो
द्वितीय स्थानात असलेला नेपच्युन गूढ मार्गाने धनार्जन करण्यास मदत करतो.
तृतीय स्थानात असलेला नेपच्युन उत्तम कल्पनाशक्ती देतो.लेखक तसेच कवींच्या पत्रिकेत हा नेपच्युन अधिक प्रभावी असतो आणि त्यात प्रगती दर्शवतो.
चतुर्थ स्थानात असलेला नेपच्युन जर पाप ग्रहांबरोबर असेल तर गृहसौख्य देत नाही मात्र जर जलराशीत शुभ ग्रहांसोबत असेल तर उत्तम मातृसुख देतो.
पंचम स्थानात असलेला नेपच्युन सूचक स्वप्ने पडणे, गूढ विद्यांचा अभ्यास दर्शवतो. उदाहरणार्थ ज्योतिष,तंत्र,मंत्र,जादू,इत्यादी.पंचमातील शुक्र नेपच्युन युती वेगवेगळे musical instruments शिकण्यात specialization करवतो.तंतुवाद्य,guitar,सतार, Violin यात उच्च प्रतिभाशक्ती देतो.
सहाव्या स्थानातील नेपच्युन आपल्याला गूढ आणि अनाकलनीय आजार देतो.
सप्तम स्थानात असलेला नेपच्युन जर पाप ग्रहांनी युक्त असेल तर विवाह सौख्याच्या दृष्टीने चांगला नाही.
अष्टम स्थानात नेपच्युन असल्यास गूढ मृत्यू येण्याचा संभव असतो. कश्यामुळे मरण आले हे कळतच नाही. चुकीचे औषध घेतल्यामुळे येणारे मरण, विषप्रयोगामुळे येणारे मरण, गुदमरून मारणे इत्यादी गोष्टी यात येतात.
नवम स्थानात नेपच्युन असल्यास तो जलप्रवास दाखवतो. समुद्रावरून प्रवासाचे योग्य येतात. नेपटूने जर गुरूशी नवपंचम योग करत असेल तर अध्यात्मिक प्रगतीसाठी हा नेपच्युन चांगला आहे. गूढ शास्त्रातील अभ्यासाला हा नेपच्युन उत्तम असतो.
दशम स्थानात असलेला नेपच्युन ग्रहावरून जाणारे व्यवसाय दर्शवतो.उदाहरणार्थ मनोसोपचार तज्ञ, जादुगार,ज्योतिषी,कलाकार,इत्यादी.
एकादश स्थानात असलेला नेपच्युन मैत्रीत किंवा आर्थिक लाभात फसवणुकीचे संकेत दाखवतो.
द्वादश किंवा व्यय स्थानात असलेला नेपच्युन शारीरिक त्रास, गुन्हेगारी, लबाडी, लोकांकडून त्रास दाखवतो.
बिघडलेला नेपच्युन मानसिक आजार,अतिविचाराने, अतितणावामुळे होणारे आजार, वेड लागणे, विषबाधा होणे, झोप न येणे या गोष्टी दर्शवतो.
आपल्याला जर कुंडली consultation घ्यायचे असेल तर ई-मेल करा pg37750@gmail.com किंवा तुमच्या birth details whatsapp करा ९१३७३३६७०४ या क्रमांकावर.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!
Comments
Post a Comment