शुभग्रह आणि त्यांची स्थानानुरूप उत्तम शक्ती
१.नेपच्युन,गुरु,शुक्र,बुध आणि शुक्लपक्षाचा चंद्र हे शुभग्रह आहेत.
२.चंद्र आनंद आणतो कारक तो मनाचा कारक आहे. चंद्र जर मृतावस्थेत असेल तर तो माणूस मन मेलेला,मरगळलेला वाटतो.पण तोच चंद्र जर युवा अवस्थेत असेल तर मन प्रफुल्लित राहते.freshness आणि गोड स्मितहास्य त्या माणसाच्या चेहऱ्यावर सहज दिसते.
३.चंद्र युवा अवस्थेत जर कर्क राशीत,वृषभ राशीत किंवा मीन राशीत असेल तर ती मुलगी खूप active असते.एकादश स्थानातील चंद्र entrepreneurship साठी चांगला असतो.
४.वाचास्थानी नेपच्युन जर युवा अवस्थेत असेल तर भविष्य चांगले सांगता येईल.जर तो जलराशीत असेल तर तो मनुष्य बोलतो तसे घडते.
५.कन्या राशीमध्ये जर गुरु असेल तर पोट सुटलेले असेल.चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे.कर्क राशीमध्ये चंद्र असलेला खूप चांगला तर वृषभ राशीत आणखी उत्तम कारण त्याला शुक्राची साथ मिळते आणि हि चंद्राची उच्च राशी आहे.
६.सप्तम स्थानी युवा अवस्थेत असलेला शुक्र विवाह सौख्याच्या दृष्टीने चांगला असतो.पंचम स्थानात जर युवा अवस्थेत गुरु ग्रह असेल तर शिक्षणासाठी अगदी उत्तम असतो. चंद्र जर चतुर्थ स्थानात युवा अवस्थेत असेल तर मातृसौख्य व गृहसौख्यासाठी चांगला असतो.
७.ज्या मुलीच्या पत्रिकेत एकादश स्थानी मंगल असतो तिला मित्र अधिक असतात तर मुलाच्या पत्रिकेत जर एकादश स्थानी चंद्र असेल तर त्या मुलाला मैत्रिणी जास्त असतात.पंचमातील चंद्र -शुक्र युती प्रेमविवाह होण्यास कारणीभूत असू शकते.
८.बुध ग्रह पंचम स्थानात चांगला असतो तो अध्ययनासाठी चांगली बुद्धी देतो.बुध ग्रह हा ग्रह वाचास्थानात पण चांगला असतो कारण तो तिथे भावबली असतो आणि त्यात मिथुन किंवा कन्या राशीचा बुध असेल तर आणखी उत्तम. जर त्याची अवस्था युवा असेल आणि चतुर्थ स्थानी बुध असेल तर मनात काही secrets राहणार नाहीत.सारखी बडबड चालू असते.पंचमातील बुध Accountancy चे ज्ञान देतो. तो जर सप्तमात आला तर पत्नी बुद्धिमान मिळेल.
९.गुरु ग्रह जर प्रथम स्थानी असेल तर व्यक्तिमत्व भारदस्त असेल.गुरु चतुर्थात गेला तर आपले मन प्रगल्भ कारे.द्वितीय स्थानात असलेल्या गुरुचे बोलणे Cultured असते.
१०.प्रथम स्थानात जर शुक्र युवा अवस्थेत असेल तर मनुष्य Romantic असतो.जर वाचास्थानी वृश्चिक राशीचा बुध असेल तर त्याला लैंगिक विषयावर जास्त बोलायला आवडेल.
११.सप्तम स्थानी गुरु असेल तर ती स्त्री धर्माचरण करणारी असेल.
१२.द्वितीय स्थानातील नेपच्युन गूढ आणि गोड वाणी देईल.नवम स्थानातील नेपच्युन effective असतो,अध्यात्मासाठी चांगला असतो.कर्क आणि मीन राशीत नेपच्युन असणारी जातकांना गुढरम्यता भावेल.
आपल्याला जर कुंडली consultation घ्यायचे असेल तर ई-मेल करा pg37750@gmail.com किंवा तुमच्या birth details whatsapp करा ९१३७३३६७०४ या क्रमांकावर.परत भेटुच एका नवीन लेखासह.तोपर्यंत हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!
Comments
Post a Comment