पञिकेतील हर्षल(Uranus)

हर्षल म्हटले की,विलक्षण,प्रचंड,रुढीबाह्य,लहरीपणा,वैज्ञानिक दृष्टिकोण,अचाट बुद्धीमत्ता,जगावेगळे करण्याचे धाडस,वैज्ञानिक शोध,आकस्मिक घटनांचा कारकग्रह.नवपंचम योगात चांगली फळे देतो.बुध-हर्षल युती बुद्धीच्या दृष्टीने चांगली,शुक्र-हर्षल नवपंचम कलेच्या दृष्टीने चांगला.शुक्र-हर्षल युती विवाहसौख्याच्या दृष्टीने वाईटच.हर्षल कुंभ(Aquarius) राशीत चांगली फळे देतो.हर्षल हा विज्ञानाचा पुरस्कार करणारा ग्रह आहे.Research करणाऱ्या माणसासाठी सर्वात चांगला आणि महत्त्वाचा ग्रह आहे. प्रथम स्थानी हर्षल असता माणसाला विक्षिप्त स्वभाव देतो. द्वितीय स्थानात हर्षल असता अचानक उद्भवणारे खर्च/आर्थिक संकटे आणि बोलण्यात फटकळपणा देतो. तृतीय स्थानातील हर्षल उत्तम आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती देतो. चतुर्थ स्थानात हर्षल असता मातृसौख्य व गृहसौख्य चांगले मिळत नाही,सारखी भांडणे होतात. पंचम स्थानातील हर्षल बुद्धीमत्तेच्या दृष्टीने चांगला असतो.बायकांच्या पञिकेत पंचमातील हर्षल abortions, मुलं जन्माच्या वेळेस त्रास दाखवतो. सहाव्या स्थानात हर्षल असता अचानक उदभवणारे आजार दाखवतो.कोणाबरोबर आहे त्यानुसार आजार दर्शवतो.उदाहरणार्थ मंगळाबरोबर असता भाजणे,उष्णतेचे विकार,मुळव्याध,इत्यादी. सप्तम स्थानी हर्षल वैवाहिक सुखाला चांगला नसतो.विवाह ठरण्यात अडथळे येतात,ठरलेलं लग्न मोडतं. अष्टम स्थानी हर्षल असता अकस्मात मृत्यु येण्याचा संभव असतो. नवम स्थानात हर्षल असता सारखे परदेश प्रवास करावे लागतात. दशम स्थानी हर्षल असता नोकरी/व्यवसायात बदल दर्शवतो.शुभ ग्रहयोगात चांगली प्रगती तर अशुभ योगात अडचणी दाखवतो. एकादश स्थानी हर्षल असता मिञांशी जास्त पटत नाही आणि आर्थिक बाबतीत स्थिरता येत नाही. द्वादश स्थानी हर्षल जर पाप ग्रहांबरोबर असेल तर वाईटच.लोकांबरोबर भांडणे,हाणामाऱ्या होतात.समाजात आपले नाव खराब होते. आपल्याला जर कुंडली consultation घ्यायचे असेल तर ई-मेल करा pg37750@gmail.com किंवा तुमच्या birth details whatsapp करा ९१३७३३६७०४ या क्रमांकावर.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House