आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा : रॉकी बाल्बोआ

ही गोष्ट आहे रॉकी चित्रपटाचा जगप्रसिद्ध हिरो सिल्व्हेस्टर स्टेलोन याची. जन्मापासून तोंडाला झालेल्या पॅरालीसीस मुळे त्याच्या चेहऱ्यात आणि बोलण्यात एक व्यंग होते.त्याचे acting career सुरु होत नव्हतं आणि परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. दिवस इतके वाईट आले की त्याला न्यूयॉर्क च्या बस स्टेशन मध्ये तीन आठवडे झोपावे लागले. त्याचा अत्यंत आवडता कुत्रा केवळ आपल्यामुळे भुकेने मरू नये म्हणून नाईलाजाने त्याला २५ डॉलरला विकावा लागला. कुत्रा देऊन परत जात असताना सिल्वेस्टर ओकसाबोकसी रडत होता. त्यानंतर काही दिवसात सिल्व्हेस्टर ला मोहम्मद अलीच्या boxing सामान्यांवरून रॉकी चित्रपटाची कल्पना सुचली. त्याची script त्याने तीन दिवसातच लिहून काढली .स्वतः लिहिलेल्या रॉकी च्या script ला एक प्रोड्युसर २५००० डॉलर मध्ये विकत घ्यायला तयार झाला.मात्र सिल्व्हेस्टर ची एक अट होती की मीच या चित्रपटात lead role करणार पण producer ला एक मोठा actor या चित्रपटासाठी हवा होता. producer ने script ची किंमत वाढवत २ लाख पन्नास हजार डॉलर्स पर्यंत नेली पण सिल्व्हेस्टर ने आपला हट्ट सोडला नाही.अखेरीस producer ने सिल्व्हेस्टर ला lead hero म्हणून चित्रपटात घेतले पण यासाठी त्याला फक्त ३५००० डॉलर्स दिले. नंतर तो पैसे मिळाल्यावर पहिल्यांदा आपला प्रिय कुत्रा परत मिळविण्यासाठी गेला. दुप्पट,तिप्पट पैसे देऊनही तो माणूस कुत्रा द्यायला तयार नव्हता. शेवटी तब्बल २५००० डॉलर्स देऊन त्याने आपला प्रिय कुत्रा परत मिळवला. रॉकी चित्रपट तुफान चालला.त्या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले.त्याला सर्वोत्कृष्ट कलाकारासाठी नामांकनही मिळाले आणि रॉकी अमेरिकेच्या इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. मित्रांनो,जीवनात कितीही वाईट परिस्थिती आली तरीही आपल्या स्वप्नांवरचा विश्वास उडू देऊ नका. never ever give up कारण स्वप्न पूर्ण होतात.मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.ब्रह्माण्ड आणि आकाशगंगेतील साऱ्या शक्ती माझ्यासोबत आहेत आणि माझ्या अंतरंगात त्या ऊर्जेचा मुबलक साठा आहे. आता जे काही होऊ दे,मला पुढे जाण्यापासून जगातील कोणतीच शक्ती रोखू शकणार नाही,मला सर्व शक्य आहे. जे मी विचार करू शकतो,ते सर्व मी करू शकतो,ते सर्व मी करू शकतो.Be the Best. परत भेटुच एका नवीन लेखासह.तोपर्यंत हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House