वास्तुशास्त्राप्रमाणे देवघर कसे असावे ?

 १. देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे  लक्ष्य देणे गरजेचे आहे. देवघर वरून  नेहमी चपटे असावे. 

२. देवघर ईशान्य( North East ) दिशेला असायला पाहिजे. हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तरीही चालेल. 

३. देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे. 

४. तीर्थक्षेत्रातुन विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात. पारंपारिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे. 

५. मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे.मूर्ती ४ इंचांहून जास्त उंच नको. 

६. नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिकादेवी आदी मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेऊ नयेत. 

७. महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या रूपात नाही. 

८. पूजा करताना तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असायला पाहिजे. 

९. दिवा देवघराच्या आग्नेय(South East ) कोपऱ्यात असायला पाहिजे. पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे.पूजेत शंख-घंटीचा उपयोग जरूर करावा. 

१०. निर्माल्य, पुष्प आणि नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे. ते घरात ठेवणे वर्जित असते.

११. पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे. 

१२. नैवद्य नेहमी गोड वस्तुचा दाखवावा.खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे.विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवद्य दाखवावा. 


तुम्हाला जर वास्तुशास्त्र,अंकशास्त्र,ज्योतिष शास्त्र याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर खाली comment करा किंवा माझ्या ९१३७३३६७०४ या क्रमांकावर संपर्क करा.परत भेटुच एका नवीन लेखासह.तोपर्यंत हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!


Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House