शुभग्रह आणि त्यांची स्थानानुरूप उत्तम शक्ती
१.नेपच्युन,गुरु,शुक्र,बुध आणि शुक्लपक्षाचा चंद्र हे शुभग्रह आहेत. २.चंद्र आनंद आणतो कारक तो मनाचा कारक आहे. चंद्र जर मृतावस्थेत असेल तर तो माणूस मन मेलेला,मरगळलेला वाटतो.पण तोच चंद्र जर युवा अवस्थेत असेल तर मन प्रफुल्लित राहते.freshness आणि गोड स्मितहास्य त्या माणसाच्या चेहऱ्यावर सहज दिसते. ३.चंद्र युवा अवस्थेत जर कर्क राशीत,वृषभ राशीत किंवा मीन राशीत असेल तर ती मुलगी खूप active असते.एकादश स्थानातील चंद्र entrepreneurship साठी चांगला असतो. ४.वाचास्थानी नेपच्युन जर युवा अवस्थेत असेल तर भविष्य चांगले सांगता येईल.जर तो जलराशीत असेल तर तो मनुष्य बोलतो तसे घडते. ५.कन्या राशीमध्ये जर गुरु असेल तर पोट सुटलेले असेल.चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे.कर्क राशीमध्ये चंद्र असलेला खूप चांगला तर वृषभ राशीत आणखी उत्तम कारण त्याला शुक्राची साथ मिळते आणि हि चंद्राची उच्च राशी आहे. ६.सप्तम स्थानी युवा अवस्थेत असलेला शुक्र विवाह सौख्याच्या दृष्टीने चांगला असतो.पंचम स्थानात जर युवा अवस्थेत गुरु ग्रह असेल तर शिक्षणासाठी अगदी उत्तम असतो. चंद्र जर चतुर्थ स्थानात युवा अवस्थेत असेल तर मातृसौख्य व गृहसौख्...